vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

“हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

 

नांदेड, प्रतिनिधी : दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शीख सिकलीकर, बंजारा-लबाना, मोहियाल, सिंधी तसेच इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

 

या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हे तसेच देशातील विविध राज्यांतून सुमारे ८ ते १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या कालावधीत शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीचा शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक ठरल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुका हद्दीतील सर्व अंगणवाडी, शासकीय व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तथापि, ज्या ठिकाणी परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहतील. तसेच दि. २४ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली सुट्टी पुढील शालेय व महाविद्यालयीन कामकाजात अर्धा दिवस वाढवून भरून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी निर्गमित केला आहे.

****

संबंधित पोस्ट

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन

परिवर्तनवादी गीते, प्रबोधनात्मक व्याख्यान.. यंदाची भीमजयंती ठरणार विचारांचा महोत्सव! सार्वजनिक जयंती उत्सव समितीची जय्यत तयारी; अध्यक्ष निलेश राऊत यांची माहिती …

उष्माघाताचा वाढता धोका : खबरदारी घेतली तर संकट टळेल..

ग्रामीण भागातील नागरिकांनापिण्याचे पाणी उपलब्धत करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी

vishwatmaklokswamivarta