vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी, मराठी अधिकारी आणि माध्यमकर्मीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला

जुन्या महाराष्ट्र सदन येथे आयोजित शोकसभेला खासदार रविंद्र वायकर, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, माहिती संचालक हेमराज बागुल प्रतिनिधी प्रतिनिधी आणि प्रफुल्ल पाठक, केंद्रीय पोलीस अधिकारी डॉ.धनंजय घनवट, सायबर अधिकारी विनायक गोडसे, सहायक निवासी आयुक्त, नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.खासदार रविंद्र वायकर यांनी अजित दादा म्हणजे राजकारणातील ‘दादा’ माणूस होते. असे सांगून विधानसभेतील त्यांचा वावर, कामाची शिस्त, हजरजबाबीपणा आणि प्रशासनावरील पकड याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या मैत्रीच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

निवासी आयुक्त आर. विमला यांनी प्रशासनात काम करताना त्यांच्या वक्तशीरपणाचा आणि लोकहिताच्या कामाला प्राधान्य देण्याच्या वृत्तीचा आम्हाला नेहमीच अनुभव आला. चांगल्या कामासाठी ते सदैव पाठीशी उभे राहत, असे नमूद केले.

माहिती संचालक हेमराज बागुल यांनी अजित दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. स्पष्ट भूमिका आणि रोखठोक स्वभाव ही त्यांची ओळख होती. पदापेक्षा त्यांचे कार्य आणि जपलेले माणुसपण खूप मोठे होते, असे गौरवोद्गार काढले.

प्रफुल पाठक यांनीही अजित दादांसोबतच्या कामाचे अनुभव सांगत त्यांच्यातील संवेदनशील माणूस अधोरेखित केला.आसाम येथील पोलीस अधिकारी डॉ धनंजय घनवट यांनी दादांनी केलेला बारामतीचा विकास हे विकासाचे उत्कृष्ट मॉडेल असल्याचे सांगितले. बारामतीच्या भूमीपुत्राने आपल्या कार्यप्रणालीने देशात आपला नाव लौकिक वाढवावा. बारामतीचे नाव मोठे करावे असा सल्ला दिला असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाने राज्याचे खुप नुकसान झाले असून मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले.

विनायक गोडसे यांनी तंत्रज्ञान, सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर अजित दादा यांच्याशी झालेल्या वेग वेगळ्या चर्चा यांचा संदर्भ देत आठवणीना उजाळा दिला.यावेळी सदनातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला प्रारंभ; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन 

भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे यांचा समावेश विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा – भास्कर आबा दानवे

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• *रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती *मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा एकात्मिक मास्टर प्लॅन……

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर