vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा…

राज्य प्रतिनिधी-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाचे  संरक्षण मंत्री निकोलाओस-जॉर्जिओस डेन्डियास यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी अधोरेखित केले की भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी शांतता, स्थैर्य, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान या समान मूल्यांवर आधारित आहे.

दोन्ही देशांनी भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रम आणि ग्रीसच्या एजेंडा 2030 अंतर्गत संरक्षण सुधारणा यांच्या माध्यमातून आपापल्या संरक्षण उद्योगांची क्षमता भागीदारीद्वारे वाढवण्याचा निर्णय घेतला. भारत आणि ग्रीस यांच्यातील संरक्षण औद्योगिक सहकार्य बळकट करण्यासाठी संयुक्त आशय पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली असून त्यातून पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होत असल्याची दखल घेतली. 2026 साठी द्विपक्षीय लष्करी सहकार्य आराखड्याची दोन्ही देशांदरम्यान देवाणघेवाण झाली, यात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील लष्करी उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

प्राचीन समुद्रपरंपरा असलेल्या या दोन्ही राष्ट्रांमध्ये महत्त्वाच्या सागरी विषयांवरील एकमतही अधोरेखित करण्यात आले. ग्रीकच्या बाजूने इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (आयएफसी-आयओआर), गुरुग्राम येथे एक ग्रीक आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकारी नेमण्याची घोषणा केली गेली.

या बैठकीपूर्वी ग्रीसचे संरक्षण मंत्री यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना आदरांजली वाहिली. तसेच माणेकशॉ केंद्र येथे तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना देण्यात आली.भेटीदरम्यान हेल्लेनिक शिष्टमंडळाने बेंगळुरू येथील महत्त्वाच्या संरक्षण व औद्योगिक संस्थांना भेट दिली तसेच नवी दिल्लीत डीपीएसयू, संरक्षण उद्योग आणि स्टार्ट-अप प्रतिनिधींशी संवाद साधला. ही भेट भारत आणि हेल्लेनिक प्रजासत्ताक यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला दुजोरा देते , जी दोन्ही देशांतील आणि जनतेतील दीर्घकालीन, जिव्हाळ्याच्या व निकट संबंधांवर आधारित आहे.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

जालना जिल्ह्यात ‘विपश्यना केंद्रा’ सह बहुउद्देशीय सुविधा उभारणीला गती द्यावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खतेआणि कर्ज उपलब्ध करा- पालकमंत्री शिरसाट