vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

जिल्ह्यात “सुरक्षित इंटरनेट दिन २०२६” उत्साहात साजरा

जिल्ह्यात “सुरक्षित इंटरनेट दिन २०२६” उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- “सुरक्षित इंटरनेट दिन २०२६” उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच सर्व उपविभागीय अधिकारी (SDM) व तहसील कार्यालयांसह एकूण १० पेक्षा अधिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उपक्रमांचे मार्गदर्शन एन.आय.सी. संचालक उन्मेष सपकाळ व माहिती व तंत्रज्ञान विभाग जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर , जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले. सर्व कार्यक्रमांचे नेतृत्व संबंधित कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग (DIT) यांच्या नेटवर्क अभियंत्यांमार्फत प्रत्यक्ष कार्यालय जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व, सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ऑनलाइन फसवणूक ओळखण्याचे मार्ग, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे नियम, दोन-स्तरीय प्रमाणीकरणाचा (Two-Factor Authentication) वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, तसेच मुलांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कर्मचऱ्यांनी नागरिकांनी अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश व फसवे कॉल याबाबत सतर्क राहावे, सार्वजनिक Wi-Fi वापरताना काळजी घ्यावी आणि अधिकृत संकेतस्थळांवरच व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले. डिजिटल साक्षरता वाढविणे आणि सुरक्षित, सकारात्मक व जबाबदार इंटरनेट संस्कृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून सुरक्षित इंटरनेट वापराचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविला.

00000

संबंधित पोस्ट

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून-पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन-अमेरिकेच्या ‘द रॉकफेलर फाउंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट’ व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

vishwatmaklokswamivarta

डिजिटल शेती शाळेत शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

vishwatmaklokswamivarta