vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…

        अमरावती, प्रतिनिधी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन 2025-26 या वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामांमध्ये बदल करून विकासकामे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळणार आहे.

   जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत सांडपाणी निचऱ्यासाठी नाली, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, एलईडी लाईट आणि पेविंग ब्लॉक बसवणे यांसारख्या 670 कामांची निवड करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचे प्रमाण जास्त असल्याने ही कामे बदलविण्याची सूचना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केली होती. तसेच सांडपाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्था आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गट विकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील 112 कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे आता 670 विकासकामे सुरू होणार आहे.

       या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकऐवजी आता आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये गटारे, पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. सर्व कामांचे जिओ टॅगिंग आणि छायाचित्र पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. बदललेल्या 112 कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव, प्रमाणपत्रे आणि अंदाजपत्रकासह तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम मिशन मोडवर राबवावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

vishwatmaklokswamivarta

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन