vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-

डान्सबारसाठी सर्वोच्च न्यायालयाने जाचक अटी घातल्यानंतर अनेक बारचालकांनी ऑर्केस्ट्रा बारच सुरू ठेवण्यावर समाधान मानले. मात्र, केवळ ऑर्केस्ट्रामुळे ग्राहक येत नसल्याने छुप्या मार्गाने नृत्यही या बारमध्ये चालते. राज्यातील बियर बार मध्ये ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याची त्याची वारंवार तक्रार येत असल्याने विधानसभेत  माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील बियर बारची चौकशी करणार चे आर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार सुरू आहे त्या सर्वांची चौकशी केली आहे जाणार आहे

यापूर्वी मुंबई अशाच प्रकारे -मुंबईतील ‘सावली’ बारवरून राजकारण तापले असतानाच उपनगरांतील अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी ताडदेव, अंधेरी आणि घाटकोपरमधील नामांकित बारवर छापा टाकून अनेकांची धरपकड केली. या तीनही बारमधून २५ बारबालांची सुटका करण्यात आली असून त्यांच्यावर पैसे उडवत अश्लील नृत्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या जवळपास ६० जणांवर कारवाई करण्यात आली. बारचालक आणि मालक यांच्यावर याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आले होते तर अशाच प्रकारे उपनगरातील

अंधेरी येथील साची बार अँड रेस्टॉरंटमध्ये नियम डावलून गाणी गाण्याच्या बहाण्याने बारबालांना अश्लील नृत्य करण्यास लावले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट १० च्या पथकाने शहनिशा करण्यासाठी या बारवर छापा टाकला असता सात महिला नृत्य करताना आढळून आल्या. जवळपास वीस ग्राहकांना त्यांना नृत्य करण्यास प्रोत्साहित करताना पकडण्यात आले. ग्राहक, बार कर्मचारी अशा सुमारे २६ जणांविरुद्ध अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अशाच प्रकारे आणखी एका प्रकरणात

घाटकोपर येथील त्रिमूर्ती बारमधून तीन ते चार बारबालांची गुन्हे शाखा युनिट सात च्या पथकाने सुटका केली होती. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्व नियम पायदळी तुडवून डान्सबार चालविणाऱ्या चालक आणि मालकासह याप्रकरणी १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच्या घटना लक्षात घेता पुन्हा एकदा आर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने यावेळी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी

बारच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आर्केस्ट्रा बारवर कारवाई करणार असल्याचे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले आहे

संबंधित पोस्ट

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न..

जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत बैठक घेणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील