vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

राज्य प्रतिनिधी#महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नामनिर्देशन पत्र उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास गो. आठवले, किंवा सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे, किंवा अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा सचिन तांबे यांच्यापुढे ५ मार्च २०२६ पर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे कक्ष क्रमांक ८०२, आठवा मजला, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – ४०० ०३२ येथे स्वीकारण्यात येतील. त्याच ठिकाणी व वेळेत नामनिर्देशनपत्रे उपलब्ध राहतील.

नामनिर्देशन पत्रांची छाननी ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता विधान भवन येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची लेखी सूचना ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.

निवडणूक लढविली गेल्यास मतदान १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई येथे होणार आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास सो. आठवले यांनी प्रसिद्ध केली आहे.

संबंधित पोस्ट

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार- उद्योगमंत्री उदय सामंत· महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून रोजी सिल्वासा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित