vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

मुंबई प्रतिनिधी-मराठा आरक्षण उपसमितीची नववी बैठक आज संपन्न झाली. उपसमितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने सारथी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आहे. आज घेतलेल्या आढावा बैठकीत सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे तसेच शासनाच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी समाजातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, उद्योजकांच्या संघटनांशी सातत्याने संपर्क ठेवून, नामांकित प्रशिक्षण संस्थांचे मार्गदर्शन घेत कौशल्य विकास उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे निर्देश दिले.

यासोबतच सारथी संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांसाठी उपलब्ध निधीचाही आढावा घेतला. राज्य शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ४४२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच पुरवणी मागण्यांद्वारे ३०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

राज्यात सारथी संस्थेमार्फत एकूण आठ वसतीगृह उभारण्यात येत असून त्यापैकी सहा वसतीगृहांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या वसतीगृहांमध्ये सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था होणार आहे. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध करून द्यावीत तसेच वसतीगृहांचे व्यवस्थापन नामांकित संस्थांकडे सोपवावे, अशा सूचना दिल्या.

सन २०२५-२६ या वर्षात सारथी संस्थेमार्फत ३४ प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या असून ४८,३८१ मराठा, कुणबी मराठा व मराठा कुणबी समाजातील लाभार्थ्यांवर एकूण २२२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत १,१७९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच १६४ देशांतर्गत शिष्यवृत्तीधारक आणि कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षित १०,२०९ अशा एकूण ११,९१५ विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सारथी संस्थेच्या उपक्रमांना आवश्यक ते सर्व पाठबळ देण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न