vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-प्रत्येक बालकाला प्रेमळ, सुरक्षित आणि कुटुंबीय वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा प्रशासन, बुलढाणा यांच्यावतीने संस्थाबाह्य संगोपन (प्रायोजकत्व / प्रतिपालकत्व) योजनेसाठी इच्छुक पालकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

👶 कोणासाठी ही योजना?अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांची किंवा दीर्घकाळ भेट नसलेली बालके – ज्यांना कुटुंबीय आधाराची गरज आहे.

✅ पात्रता निकष (संक्षेप):• शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम• जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी• गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी• विवाहित जोडप्यांसाठी दोन्ही जोडीदारांची संमती आवश्यक• एकल महिला : मुलगा / मुलगी दोन्ही स्वीकारू शकते• एकल पुरुष : फक्त मुलगा स्वीकारू शकतो• प्रेमळ व सुरक्षित वातावरण देण्याची बांधिलकी

🎯 वयोमर्यादा:बालक व अर्जदारांसाठीचे निकष नियमानुसार लागू📝 अर्ज प्रक्रिया:शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा. पडताळणी व गृहभेटीनंतर प्रकरणाची शिफारस बाल कल्याण समिती, बुलढाणा कडे केली जाईल

🏠 कालावधी:अल्पकालीन (१ वर्ष) / दीर्घकालीन (१८ वर्षांपर्यंत – मूल्यांकनाधारे)

ℹ️ संपर्कासाठी:जिल्हा बाल संरक्षण कक्ष,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बुलढाणा📞 02762-299366📧 dcpubuldana@gmail.com👉 एका बालकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी – आजच पुढे या!

संबंधित पोस्ट

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.