vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे अर्थ संकल्पात प्रतिबिंब

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या धोरणाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणाऱ्या कर्जमाफीसारख्या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून लाखो शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी मिळेल.

याशिवाय उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या तरतुदी, रोजगारनिर्मितीला गती देणारे उपक्रम, पायाभूत सुविधा बळकट करणारे प्रकल्प, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधीचे निर्णय यामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत होईल, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण व शहरी भागातील संतुलित विकासाचा विचार या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टीनेही हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगताना आ. मुनगंटीवार यांनी विशेष आनंद व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्याला सागवानाच्या समृद्ध वारशाची परंपरा लाभलेली आहे. या ऐतिहासिक व नैसर्गिक संपत्तीचे जतन, संशोधन आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने बल्लारपूर येथे टिम्बर म्यूझीअम – झायलेरियम स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या निर्णयाचे आ. मुनगंटीवार यांनी मनापासून स्वागत केले.

त्यांच्या मते, या टिम्बर म्यूझीअममुळे सागवानासह विविध प्रकारच्या लाकडांच्या प्रजाती, त्यांचा इतिहास, वैज्ञानिक अभ्यास, उपयोग आणि पर्यावरणीय महत्त्व याबाबत संशोधन व जनजागृतीला मोठी चालना मिळेल. तसेच हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता पर्यटन, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख अधिक भक्कम करण्यास या उपक्रमाची मोठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प म्हणजे विकास, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल.

या सर्वसमावेशक आणि लोकहितकारी अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

कबड्डी असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी स्पर्धा…

vishwatmaklokswamivarta

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध् – शिरसाठ,परिषदेच्या ठरावांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – सावे ,मराठवाडा व्यापार परिषदेस व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी