vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गतजिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप- अभियानात 11 हजार रूग्णांची नेत्र तपासणी- 1205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गतजिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप- अभियानात 11 हजार रूग्णांची नेत्र तपासणी- 1205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सांगली, प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर घेण्यात आलेल्या नमो नेत्र संजीवनी स्वस्थ अभियानांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या गरजूंना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या माध्यमातून दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात सरकारी दवाखाने, विविध स्वयंसेवी संस्था (NGO) तसेच नेत्रचिकित्सालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर आवश्यक होता, अशा रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता पवार, जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. गायत्री खोत, तसेच जिल्ह्यातील नेत्रचिकित्सा अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नागरिकांनी वेळेवर नेत्र तपासणी करून डोळ्यांचे आरोग्य जपावे. अवयवदानातून आपण अजरामर राहू शकतो. मरावे परी कीर्तीरूपी उरावे, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून अवयवदानाचा फॉर्म भरावा व याबाबत आपल्या परिवारात नातेवाईकांना सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या अभियानाच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात सुमारे 11,000 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,967 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. अभियानाच्या कालावधीत 1,205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया नंतर पूर्ण करण्यात आल्या. तसेच इतर नेत्रविकारांवरील 147 शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांनी दिली. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करून अवयवदानाचा फॉर्म भरला.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांचे मोफत टू डी इको तपासणी*

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; नियंत्रित क्षेत्रे घोषित, मनाई आदेश लागू

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन