vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी  सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात योजनांची माहिती देणारा चित्ररथाचे उद्घाटन आज करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ ला आज जिल्ह्यात १० ठिकाणी प्रारंभ झाला. याप्रसंगाचे औचित्य साधून देवणी येथील शिबिरात या रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्य पुष्पाबाई साळुंखे, गयाबाई ठोंबरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार शिवानंद बिडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने व स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातिल १६८ गावांमध्ये हा चित्ररथ जाऊन नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथकाद्वारे धडक मोहीम सुरू- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर· दोषींवर मकोका लागू करण्यासाठी कायदा आणणार

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण