vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रमउत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव

 

नांदेड, प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व एक उत्कृष्ट मदतनीस यांची निवड करून सन २०२५–२६ च्या उत्कृष्ट सेविका व उत्कृष्ट मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आलेया पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे होते. पुरस्कारांचे वितरण ॲड. बियाणी मॅडम व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या ॲड. बियाणी मॅडम यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून आत्मविश्वासाच्या बळावर त्या अशक्य वाटणारी कामेही समर्थपणे पार पाडत आहेत, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांनी पुरस्कार विजेत्या सर्व सेविका व मदतनीसांचे अभिनंदन करून अंगणवाडीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत यावर्षात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या अंगणवाडीतील लाभार्थी व पालकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

हा कार्यक्रम बौद्ध विहार (देगाव चाळ), नांदेड येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रकल्पातील सर्व सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन शततारका कातकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गुंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पेंदे, श्रीमती शिसोदे, श्रीमती राहेगावकर, श्रीमती खिराडे, श्रीमती ढोले, श्री आऊलवार, श्री बनसोडे व श्री खूपसे यांनी सहकार्य केले.

00000

संबंधित पोस्ट

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण.

ठाण्यातील आरएमसी ट्रकमधील लपलेल्या डब्यातून लाखो रुपयांची ” पुष्पा चित्रपटाची स्टाईल ” दारू जप्त.

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी,राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ