vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, संपूर्ण जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

    पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्याकरीता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येईल.

    रायगड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर चा पुरवठा सुरळीत असल्याने घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरीकांनी चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही.

    नागरिकांनी घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करू नये. घरगुती गॅस च्या पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षातील ०२१४१-२२७४५२या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे. रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर-डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई…

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर  रुग्णालयातून डिस्चार्ज…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

vishwatmaklokswamivarta