vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आजअखेर ४५ गॅस एजन्सी, ४० हॉटेल्सची तपासणी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आजअखेर ४५ गॅस एजन्सी, ४० हॉटेल्सची तपासणी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी – सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची काटेकोर तपासणीला वेग आला येत आहे. यासाठी नियुक्त दक्षता व फिरत्या पथकांमार्फत आजअखेर ४५ गॅस एजन्सींची तसेच ४० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कालपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये कालपर्यंत एकूण ७१ हजार २०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, सांगलीतील एक आणि मिरजमधील दोघे अशा एकूण तिघांवर अवैध गॅस रिफिंलिंग करण्याप्रकरणी द्रविभूत इंधन गॅस (पुरवठा व वाटप नियंत्रण) 2000 चे कलम 4 (1)(ए)(बी) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3, 7 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तक्रार येणाऱ्या एजन्सीवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

 जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार एचपीसीएल कंपनीचा २७८४ मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा २४५ मेट्रिक टन व आयओसीएल कंपनीचा ६० मेट्रिक टन इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

मच्छीमारांनो सावधान..!*१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई*

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी