vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यातील 5 शहरांना शहर स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी-‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम..

राज्यातील 5 शहरांना शहर स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी-‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम..

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये नवी मुंबईचा समावेश असून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ संकल्पनेमध्ये ‘मार्गदर्शक शहर (Mentor City)’ म्हणून नवी मुंबईकडे कन्नड, जिंतूर, केज या 3 नगरपंचायती आणि लोणार व मलकापूर या 2 नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

  त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकारी यांच्या समुह गटाने नुकतीच या पाचही शहरांना भेटी देत पाहणी केली व स्वच्छता विषयक सुधारणांसाठी मौलिक सूचना केल्या.

    या वर्षीपासून ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट नवी मुंबई महानगरपालिका शहरास 3 नगरपंचायती व 2 नगरपरिषदा यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

      स्वच्छ शहर जोडीमध्ये स्वच्छतेच्या उत्तम पातळीवर असलेल्या शहराचे मागदर्शन स्वच्छतेबाबत सुधारणेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शहरांना मिळावे ही भूमिका असून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापनातील उत्तम पद्धती, सार्वजनिक स्वच्छता व नागरिक सहभाग अशा सर्वच बाबतीत विचारांचे आदान-प्रदान अपेक्षित आहे.

    नवी मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असून त्यांचे मार्गदर्शन केंद्र सरकारने ठरविलेल्या महाराष्ट्रातील इतर 5 शहरांना मिळावे व या माध्यमातून त्यांच्या शहरातील स्वच्छतेला अधिक गुणवत्ता लाभावी या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा असल्याचे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत पुढाकार घेतला आहे.

     या पथकांनी त्या 5 शहरांमध्ये जाऊन तेथील स्वच्छता व्यवस्थापनाची पाहणी केली. त्याठिकाणी असलेली कचरा वर्गीकरणाची पध्दत, कचरा संकलनाची पध्दत, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, जलस्त्रोत स्वच्छता अशा विविध बाबींची पाहणी करुन त्यामध्ये सुधारणा सुचविल्या. त्याचप्रमाणे माहिती प्रचार व प्रसिध्दी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करणेबाबत सूचना केल्या. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सिटी प्रोफाईलमध्ये दाखल करावयाच्या ऑनलाईन माहितीच्या पध्दतीचीही सविस्तर माहिती देण्यात आली व त्याविषयीच्या शंकांचे समाधानही करण्यात आले.

   या पाहणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत क्षेत्रभेटी दिल्या व स्वच्छता कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधतानाच तेथील नागरिकांशीही सुसंवाद साधून स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. स्वच्छता ही दररोज करण्याची गोष्ट असल्याने व त्यात नागरिक सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याने त्यावर जास्तीत जास्त भर दयावा व त्यासाठी लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावेत असे सूचित करण्यात आले    स्वच्छ शहर जोडीमधील पाचही शहरांतील अभ्यासगटाने नवी मुंबई महानगरपालिकेस भेट देऊन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रणालीतील विविध बाबींची पाहणी करावी व तशा प्रकारचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांना करण्यात आले.

  स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेकडे जबाबदारी देण्यात आलेल्या पाचही शहरांच्या स्वच्छतेमधील प्रगतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका मार्गदर्शक शहर म्हणून कटीबध्द असून या माध्यमातून देशातील शहरांमध्ये आमुलाग्र स्वच्छता बदल व्हावा या संकल्पनेला मजबूत आधार दिला जात आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

vishwatmaklokswamivarta