vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

      अमरावती, प्रतिनिधी : देशात ग्राहकांचे हित जोपाण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजगता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केले.

    जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे आज बचत भवन येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अन्न व औषधचे सहायक आयुक्त विनायक चव्हाण, वजन व मापे विभागाचे श्री. रिठे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री डॉ. अजय गाडे, अखिल भारतीय ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष अशोक हांडे उपस्थित होते

     श्री. दानेज यांनी ग्राहकांना चांगल्या सेवा आणि वस्तू मिळाव्यात यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. तसेच दाद मागण्यासाठी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवस्था उभारण्यात आली आहे. ग्राहकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ही तक्रार निवारणाची सोय करण्यात आली आहे. यासोबतच होलमार्क, आयएसआय मार्क यासारख्या गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला पुरावे सादर करावे लागतात. यात संबंधित वस्तूचे देयक हे महत्वाचे असते. बियाणांमध्ये फसवणूक झाल्यास बियाणांची पिशवी आणि त्यातील थोडे बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे. यातून त्या बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. ग्राहकांच्या हक्कांविषयी चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा आणि वस्तू मिळण्यास मदत होत आहे.

   यावेळी शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ग्राहकांच्या हक्क आणि सुविधांविषयी पथपाट्य सादर केले.

0000000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा घोटाळा 

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

शेतकर्‍यांच्या प्रश्नी शिवसेनेचा आवाज दणाणला…शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या –जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे