vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी: गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये 20 टक्के घरे ही ईडब्ल्यूएस व एलआयजी घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील याबाबतच्या प्रकारणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले

विधानसभेत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.मंत्री बावनकुळे म्हणाले की, नाशिक येथील गृहनिर्माण क्षेत्रातील या प्रकारात बनावट नकाशे, बनावट मोजणी, तसेच बनावट दस्तऐवज तयार करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही विकासकांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने भूखंडांचे छोटे-छोटे तुकडे करून या नियमाला बगल देत गरीबांना घरांपासून वंचित ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या तपासात एकूण काही प्रकरणे उघडकीस आली आहे. काही ठिकाणी एकाच दिवशी भूखंडांचे तुकडे करून मंजुरी घेण्यात आली, ज्यामुळे हा प्रकार संगनमताने केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात नाशिक येथील विकासकांसह संबंधित शासकीय अधिकारी, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून ती महिनाभरात अहवाल सादर करेल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…

विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उतसाहात

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 

खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार..