vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा

#जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा

 

नांदेड, प्रतिनिधी : जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनासाठी संकलित डेटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले.

कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जनगणना २०२७ अनुषंगाने आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक वीरेंद्र दीक्षित, सांख्यिकी अधिकारी मयूर पवार व नेहाल धुरंधरे यांनी जनगणनेची पार्श्वभूमी, प्रक्रिया व संकल्पना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत जनगणना प्रक्रियेचा पाया, अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, तसेच पहिल्या टप्प्यातील घरयादी व ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलन याबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी झेनितचंद्र र दोनतुला, अनन्या रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ अधिकारी, मनपा उपायुक्त अभिजीत वायकोस, तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*चौकट : #स्व-गणनेची विशेष सुविधा*निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले की, जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे.पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाईल.१६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करतील.यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध असणार असून, मोबाईलच्या माध्यमातून संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे.डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ

मेक फॉर वर्ल्ड’ कडे महाराष्ट्राची झेप ‘आयडिया एक्स्पो २०२६’ प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ..

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta