vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गणेशोत्सव नियोजन व सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाजाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

गणेशोत्सव नियोजन व सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाजाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

          नवी मुंबई प्रतिनिधी -आगामी गणेशोत्सव, मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कार्यक्रम व नमुंमपा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास‍ शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेत उचित कार्यवाहीचे निर्देश दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

श्री गणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरुपात साजरा करण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले असून त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्यानुसार लोकसहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री गणेशोत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा याकरिता संबंधित विभागांनी आपल्याशी संबंधित कार्यवाही जबाबदारीने पार पाडावी असे निर्देशित करतानाच गणेशोत्सवात करावयाच्या कामांची कार्यप्रणाली (SOP) तयार करावी व प्रत्येक विभागाच्या कार्यकक्षा निश्चित कराव्यात, जेणेकरुन प्रत्येक वर्षीच्या आयोजनासाठी सुयोग्य मसुदा तयार होईल अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

     श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध विभागांमध्ये 143 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले असून मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात याची काळजी घेण्यात यावी व हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तसेच इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही विविध माध्यमांतून करण्याचे सूचित करण्यात आले.

श्रीगणेशोत्सवापूर्वी रस्ते सुधारणांची कामे करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात घेत अभियांत्रिकी विभागमार्फत मागील शनिवार व रविवारीही कामे करण्यात आली याची नोंद घेत ही सुरु असलेली कामे पावसाची जशी उघडीप मिळेल तशी तत्परतेने पूर्ण करीत रहावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवरील वृक्षांच्या फांद्यांची तपासणी करुन आवश्यक त्या ठिकाणी वृक्ष छाटणी पूर्ण करुन घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

  नमुंमपा सार्वत्रिक निवडणुक 2025 चा प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा व अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेली असून त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत कालावधी आहे. सदर आराखडयाचे नकाशे महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तसेच महापालिका मुख्यालय व विभाग कार्यालये या ठिकाणी फलकांवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याबाबतच्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्ष ठेवावा असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे याचा दैनंदिन अहवाल मुख्यालयातील निवडणुक कार्यालयास नियमीतपणे पाठविण्यात यावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

           नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता तसेच सुविधा यांचे जिओ टॅगिंग करणे महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्व विभागांनी तत्परतेने नियोजन करुन कार्यवाही पूर्ण करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व विभागांनी त्यांच्याकडील सेवासुविधांची माहिती अदययावत राहील यादृष्टीने डॅशबोर्ड तयार करुन घ्यावेत व त्यानुसार आपल्या विभागाच्या कामकाजावर लक्ष व नियंत्रण ठेवावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. ही कार्यवाही कामकाजातील अचूकता, गतीमानता व पारदर्शकता वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने सर्व विभागप्रमुखांनी याकडे गांभिर्याने लक्ष दयावे व पूर्तता करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

संबंधित पोस्ट

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीताअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील रिक्त जागांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया..

ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीचेदि.17 जानेवारी रोजी आयोजन,वर्ग 1 व 2 च्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta