vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 143 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती..

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 143 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती..

नवी मुंबई प्रतिनिधी -मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

  संपूर्ण जगभरात उत्साहाने साज-या होणा-या गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ घोषित करीत मुख्यमंत्री महोदयांनी नागरिकांच्या मनातील गणेशोत्सवाची महती अधोरेखित केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही श्रीगणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धांचे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.

   वातावरणाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन गणेशोत्सवासारखा सर्वस्पर्शी उत्सवही पर्यावरणाची जपणूक करीत साजरा व्हावा या भूमिकेतून आयुक्तांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा असे आवाहन नागरिकांना मागील महिन्यापासून सातत्याने नागरिकांना केले आहे व त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

   नागरिकांनी पर्यावरणाची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच श्रीमूर्तींचे विसर्जन नैसर्गिंक जलस्त्रोतात न करता महानगरपालिकेने ठिकठिकाणी मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या 143 कृत्रिम विसर्जन तलावांपैकी आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावात करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे मा.न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावयाचे आहे.

याशिवाय श्रीगणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून कापड, कागद अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा तसेच कर्णकर्कश्य ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा आणि लेझर लाईटचा वापर टाळावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

 श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून मंडप परवानगीसाठी एक खिडकी स्वरूपात संगणकीय ऑनलाईन ई सेवा उपलब्ध करून दिल्याने मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.

  इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत मागील वर्षीपेक्षा वाढ करीत 143 इतक्या मोठया प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

या कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये बेलापूर विभागात 20, नेरुळ विभागात 26, वाशी विभागात 16, तुर्भे विभागात 21, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 16, ऐरोली विभागात 18 व दिघा विभागात 10 अशाप्रकारे एकूण 143 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. नागरिकांनी मा.न्यायालयाच्या निर्णयानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फूटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावयाचे असून पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या मूर्तींसाठीही प्राधान्याने कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करावा असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 22 पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता मागील काही वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्तोतांतील जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन त्यांचे प्रदूषण कमी होत असते. नवी मुंबई हे स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जात असून या इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमुळे पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक यशस्वी पाऊल उचलले जात आहे. या कृत्रिम तलाव संकल्पनेला दरवर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे

   नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांमार्फत विसर्जन व्यवस्था सुसज्ज असणार असून स्वयंसेवक, जीवरक्षक, अग्निशामक यांचेसह विद्युत, सीसीटिव्ही, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निर्माल्य वाहतुक अशा सर्व सुविधा तसेच तराफे, फोर्कलिफ्ट अशी यंत्रसामुग्री सुसज्ज असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाने गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुयोग्य नियोजन केलेले आहे.

    तरी पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीमूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे श्रीमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. कृत्रिम विसर्जन तलावांची पत्त्यांसह विभागवार यादी फेसबुक छायाचित्रांमध्ये अवलोकनासाठी उपलब्ध आहे

00000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta