vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

मुंबई प्रतिनिधी-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास महापौर रितू तावडे, आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन, आमदार कालिदास कोळबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, उपमहापौर संजय घाडी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०० खाट संख्येवरून ३,२८६ खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्प अंतर्गत २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल. एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आजचा हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे, असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे* लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा*निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्‍या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत

vishwatmaklokswamivarta

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

आज पासून नवरात्र उत्सव आरंभ नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन..