vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – वर्षाअखेर निमित्त होणाऱ्या युवकांच्या मद्यपार्ट्या तसेच समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून त्याविरोधात कायदेशीर कारवाई सोबतच जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या सोमवार दि.१५ व मंगळवार दि.१६ रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात व्यसनमुक्तीचा जागर केला जाईल,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश लढ्ढा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यात अंमली पदार्थ मिळण्याची ठिकाणे शोधणे, प्रतिबंधित औषधांची विक्री थांबवणे, युवकांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविण्याच्या उद्देशाने कार्यरत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे अशा विविध उपायांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतीत गांजा लागवड करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहिम सुरु करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, वर्षाची अखेर ३१ डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणावर पार्ट्या करुन मद्यपान वगैरे प्रकार होत असतात. अनेक महाविद्यालयीन युवकांचा त्यात भरणा असू शकतो. त्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात सोमवार दि.१५ व मंगळवार दि.१६ रोजी व्यसनमुक्तीचा जागर करण्यात येईल. सर्व महाविद्यालयांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगून जनजागृती करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या उपक्रमासाठी उपसंचालक उच्च शिक्षण यांनी पुढाकार घ्यावा,असेही त्यांनी निर्देशीत केले.

०००००

संबंधित पोस्ट

सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta