vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

रायगड- अलिबाग, प्रतिनिधी — समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.

पेट्रोलियम नियम, २००२ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पेट्रोल व डिझेलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच करावी लागणार असून, कोणत्याही परिस्थितीत कॅन, बाटली किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन भरण्यास व विक्रीस सक्त मनाई करण्यात आली आहे.

तसेच सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे व विक्रीची नोंद नियमितपणे राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अनधिकृतपणे पेट्रोल-डिझेल साठवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.

हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो कायम राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय  भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा-माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर..

vishwatmaklokswamivarta

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या विविध विषयांवरील २८० निवेदने स्वीकारली