vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती, प्रतिनिधी : केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते 8 एप्रिल, 2026 या कालावधीत देशभरात ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यभर ‘महा-साधना सप्ताह’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरवले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगभूत कर्मक्षमतेचा विकास व्हावा आणि त्यांच्या निरंतर ज्ञानसंवर्धनातून प्रशासकीय कार्यात गुणात्मक वाढ व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. यानुषंगाने विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘महा-साधना सप्ताहात’ सक्रियरित्या सहभाग नोंदवून ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
या सप्ताहाअंतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे अभ्यासक्रम देशातील नामांकित संस्थांकडून तयार करण्यात आले असून ते विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवर नोंदणी करुन उपरोक्त कालावधीत (दि.2 ते 8 एप्रिल 2026) किमान 4 तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
या प्रशिक्षणांमुळे प्रशासनात तंत्रज्ञान (Technology), परंपरा (Tradition) आणि दृश्यमान परिणाम (Tangible Outcomes) या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब होईल. प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणांचा विभागीय आुयक्तांनाकडून आढावा घेण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचा आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाव्दारे आयोजित या ‘महा-साधना सप्ताहात’ उर्त्स्फुतपणे सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी केले आहे.
00000

संबंधित पोस्ट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी विशेष रक्तदान शिबीरसहकार विद्यामंदिर येथे आयोजन ; बुलढाणावासियांनी रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन,थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी !साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा !

जालना येथील श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta