vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित-· बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;· प्रकल्प पुर्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे विशेष प्रयत्न..

जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित-· बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;· प्रकल्प पुर्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे विशेष प्रयत्न..

 

राज्य प्रतिनिधी: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॅट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ के.व्ही. उखळी उपकेंद्राअंतर्गत ८३० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. तथापि पळशी बुद्रूक येथील ५ मेगावॅट सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्या प्रकल्पातून परिसरातील ७०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिले आहे.

    शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा, अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ६७ विकेंद्रीत सौर प्रकल्पातून ५२ उपकेंद्रासाठी १९६ मेगावॅट वीज निर्मित करण्यात येणार आहे. त्यातील पळशी बुद्रूक आणि बोरी असे दोन प्रकल्प सुरू झाले आहे.त्यामुळे या दोन प्रकल्पातून १ हजार ५३० शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि दिवसा वीज द्यायला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील बोरी सौर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.    मेघा इंजिनिअरींग(MEIL)या विकासकाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला मेहकर तालुक्यातील बोरी हा सौर प्रकल्प ७ मे.वॅ.क्षमतेचा असून ३५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. तसेच २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला बुलडाणा तालुक्यातील पळशी बुद्रूक येथील प्रकल्प ५ मे.वॅ.क्षमतेचा असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.00000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

vishwatmaklokswamivarta

रुग्णसेवेत शासनासोबत खाजगी संस्थांचाही सहभाग- उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यात – नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन