vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

राज्य प्रतिनिधी-

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन महायुतीकडून करण्यात आलं आहे.

 

काँग्रेसनं ही निवडणूक लढवण्यावर ठाम राहात आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना उबाठा पक्षानं मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर वार्ताहरांशी संवाद साधला.

राहुरी पोटनिवडणुकीबाबत शिवसेना उबाठा आणि महाविकास आघाडी सोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

संबंधित पोस्ट

ठाण्यातील म्हाडाच्या चितळसर – मानपाडा येथील घरांच्या किमती होणार कमी २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा पारदर्शकता आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर;लाभार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध.

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक; हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ६५५ विद्यार्थांना पुरविण्यात येणार मोफत पाठ्यपुस्तके …

स्वामित्व योजनेअंतर्गत आज (दि.१८)सनद वितरण कार्यक्रम; थेट प्रसारण पाहता येणार

vishwatmaklokswamivarta

गुरुवारपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव