vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, प्रतिनिधी: मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्यांसह ४५१ सिलेंडर असा एकूण ४०,६१,७१६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-कल्याणकारी योजनांच्या ‍चित्ररथाचे उद्‌घाटन

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta