vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे योजनांचा जागर

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे योजनांचा जागर

नांदेड प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत आज 10 एप्रिल रोजी पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली.तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वच्छतेचा संदेश व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर लघुनाटिकांचे सादरीकरण करण्यात आले.

हा कार्यक्रम हुजूर साहिब रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात समतादूत प्रकल्पांतर्गत मुजाजी कांबळे, दिलीप सोडांरे, ज्योती जाधव, दिगांबर पोतूलवार, शेख इर्शाद, जयश्री गायकवाड, दिपाली हाडोळे, राणी पद्मावती बंडेवार, शारदा माळे, नागनाथ कोलमारे, बालाजी डूमणे यांनी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले.

सदर कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

00000

संबंधित पोस्ट

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित समता दिंडी, चित्ररथ उत्साहात संपन्न