vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

‘नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र शासनाने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत आयोजित “नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५” वितरण कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, संचालक (बाष्पके) श्री. ध. प्र. अंतापूरकर तसेच वरिष्ठ अधिकारी व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १६०० कारखाना प्रतिनिधींनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

यावेळी राज्यातील सुरक्षा व आरोग्य विषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल धोकादायक तसेच धोकादायक नसलेल्या उद्योगांचा गौरव करण्यात आला. विविध श्रेणींमध्ये एकूण २४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. औद्योगिक संरचनेमध्ये लवचिकता आणल्यामुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा झाला आहे. यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे.

उद्योगांना चालना देतानाच कामगारांचे हित जपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून २०१४ पासून देश व राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग आणि कामगार या दोघांचेही हित जपले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी मानवी हस्तक्षेपविरहित प्रणालीवर सरकारचा भर असून विविध सेवा ऑनलाइन केल्या जात आहेत. यामुळे तक्रारींचे त्वरित निवारण होण्यास मदत होत आहे.

महिला कामगारांच्या सक्षमीकरणासाठी, पूर्वी प्रतिबंधित असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची संधीसुद्धा देण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा उपायांनुसार, रात्री पाळीत काम करण्याचीसुद्धा परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य असून कामाचा ताण असतानाही कामगार विभागाचे अधिकारी सक्षमपणे काम करत आहेत. प्रशासन उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी नवीन कामगार संहितेमुळे वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये एकसंध व सुसंगत कायदेशीर चौकट निर्माण होऊन यामुळे कामगारांना अधिक सुरक्षितता, आरोग्यदायी कामाचे वातावरण आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील, तसेच उद्योगांना प्रक्रियेत सुलभता आणि स्पष्टता प्राप्त होईल, असे नमूद केले.

या कार्यक्रमात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक दीपक पोकळे यांनी प्रास्ताविक करताना नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयावर पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता, २०२०” या विषयावर प्रशिक्षण सत्रही पार पडले. औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दि. १२ एप्रिल २०२६ रोजी नवी मुंबईतील पाल्म बीच रोड येथे “Run for OSH-2026” या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

महाज्योती’ची ऑनलाईन प्रशिक्षण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर  – मंत्री अतुल सावेजेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नव्याने अर्ज करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ..

नागपूर बुक फेस्टिव्हल – २०२५’ अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta