vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

राज्य प्रतिनिधी-राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुळा-मुठा नदीला प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्यादृष्टीने आज मुंढवा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच भैरोबा नाला सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसराची पाहणी केली; मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुळा-मुठा नदीला प्रदूषणातून मुक्त करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असून प्रदूषणाचे मूळ शोधून त्यावर तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलावीत. मुळा-मुठा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

पुण्यातील सांडपाणी प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी भैरोबा नाला येथील प्रकल्पाचा संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेतला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. नदीत कचरा टाकणे थांबवूया, पुण्याचे वैभव वाचवूया, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी पुणे करांना उद्देशून केले.

 

 

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

विशेष – लेख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-2)

vishwatmaklokswamivarta