vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी बातमी! 13-14 एप्रिल शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल; आंबेडकर जयंतीनिमित्ताने निर्देश

मुंबईकरांसाठी बातमी! 13-14 एप्रिल शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल; आंबेडकर जयंतीनिमित्ताने निर्देश

मुंबई प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाचे वाहतूक बदल जारी केले आहेत. त्यामुळे 13 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 135वी जयंती आहे. 14 एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या जयंतीनिमित्त हजारो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीला भेट देतात. त्यामुळे या परिसरात 13 एप्रिलपासूनच नागरिक दाखल होण्यास सुरूवात होते. ही गर्दी लक्षात घेऊन चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांजवळील वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. 14 एप्रिल मध्यरा‍त्री 12 पर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

कोणत्या मार्गांवर बदल?सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्चपर्यंत एसके बोले रोड या मार्गावरील एकाबाजूची वाहतूक बंद केली जाणार आहे. तसेच, सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन दरम्यान एसव्हीएस रोड सर्व वाहनांसाठी बंद राहील. मात्र, स्थानिक रहिवाशांना रस्ता क्रमांक 5 मार्गे प्रवेश दिला जाईल. रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असून ज्ञानेश्वर मंदिर रोड एसव्हीएस रोडच्या जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत बंद असेल.

अवजड वाहनांवरही बंदी-चैत्यभूमीजवळ गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक सुलभ करण्यासाठी टेम्पोसह सर्व अवजड आणि मालवाहतूक वाहने वळवण्यात येतील. बेस्ट बसला वगळता अवजड वाहने माहीम जंक्शनवरून एलजे रोडमार्गे वळविण्यात येणार आहे

पार्किंग व्यवस्था-दरम्यान, काही ठराविक ठिकाणी पार्किंगला मंजुरी असेल,सेनापती बापट मार्ग (माहीम आणि दादरहून येणाऱ्या वाहनांसाठी)इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल, एल्फिन्स्टनकोहिनूर स्क्वेअर पीपीएल, कोहिनूर मिल कंपाऊंड, शिवाजी पार्ककामगार स्टेडियम, सेनापती बापट मार्गइडिया बुल्स सेंटर पीपीएल, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्ट

फाइव्ह गार्डन-या कालावधीत मुंबईकरांनी या सर्व निर्देशांचे पालन करत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिले आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण..

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य; १ डिसेंबरपासून होणार कारवाई…

vishwatmaklokswamivarta

वसुंधरा दिनानिमित्त फेस कॉम ग्रुप ज्येष्ठांची निसर्ग उद्यानाला भेट…

सहकारी उपसा जलसिंचन योजनांची थकबाकी बँकांनी वसुली करू नये- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील