vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ…

पुणे प्रतिनिधी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभविद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळअधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ, नऊ व ११ वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईत येत्या काही दिवसांत किमान १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट – महापौर श्रीमती रितू तावडे

vishwatmaklokswamivarta

संकल्प कार्यसंस्कृतीचा.. ध्यास राज्याच्या विकासाचा”महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक,जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न

vishwatmaklokswamivarta