vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

    अमरावती, प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

    डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य, महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खासगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. निबंधाच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

     दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतील. या गटाला ८०० ते १ हजार २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमाकावर संपर्क करू शकतील. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती- शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

पीक विमा उतरवला नाही म्हणूनशेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांच्या जात वैधता अर्ज स्वीकृतीसाठी 15, 16 रोजी कार्यालय खुले

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांनाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार