कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..
ठाणे, प्रतिनिधी- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उदभवणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उददेशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर गुणनियंत्रण भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट भरारी पथकामार्फत थेट कारवाई करण्यात येणार आहे.चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभाग सतर्क राहून काम करीत आहे. रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक सर्व निविष्ठांचा पुरवठा शासनामार्फत करण्यात आला आहे. तथापि हंगामात खत टंचाईसारख्या अडचणी निर्माण होवू नयेत, यासाठी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये गुणनियंत्रण निरीक्षक, विभागीय भरारी पथक, जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यरत असून कृषी निविष्ठांच्याबाबत त्यांचे बारकाईने लक्ष असून त्यांनी तपासणी मोहिमेंतर्गत निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने आतापर्यंत कोकण विभागामधील ठाणे 04, रायगड 02, रत्नागिरी 12 व सिंधुदुर्ग 13 एवढे निविष्ठा विक्री परवान्यांवर कारवाई प्रस्तावित केलेली आहे. तसेच कोकण विभागामध्ये 1 एप्रिल 2025 पासून आतापर्यंत बियाणे विक्री परवाने 2, खत विक्री परवाने 23, किटकनाशके 1 असे परवाने रद्द, निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत या खतांच्याबाबत 3 पोलीस केसेस व किटकनाशकांबाबत 1 पोलीस केस दाखल करण्यात आल्या आहेत.
कृषी सेवा केंद्र, गोडावूनमध्ये ठेवलेला खत साठा व e-Pos मशीनचा खत साठा सारखा असेल याची काळजी घ्यावी, यामध्ये तफावत असता कामा नये. खत विक्री पॉस मशीनमधूनच करणे व नियमित करणे, साठा व भाव फलक दर्शनी भागात लावावा, तसेच खत विक्री करताना लिंकिंग न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुषंगाने कृषी विभागामार्फत विभागीयस्तरीय व जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत वेळोवेळी आपल्या कृषी निविष्ठा विक्री स्ट्राची तपासणी करत राहणार आहेत. या तपासणीमध्ये कृषी निविष्ठांबाबत काही अनियमितता तसेच कायद्यांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास या कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदीअन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे यांनी दिली.
कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास आपले जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे या कार्यालयांशी पुढील नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंदविण्यात यावी, असे विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे-4 बालाजी ताटे यांनी कळविले आहे.
विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक ८६९१०५८०९४, ई-मेल – toqcthanediv@gmail.com
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक-७०३९९४४६८९, ई-मेल- dsaothane.2021@gmail.com
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – ९९२१५४३४९९, ई-मेल- dsaopalghar@rediffmail.com
जिल्हा अधीक्षक कृषी: अधिकारी, रायगड – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – ९५०३१७५९३४, ई-मेल- dsaoraigad@gmail.comजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – ८८३०२६४३३५, ई-मेल- dsaortn@rediffmail.comजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग – संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – ९४२३९२२३४६, ईमेल- saosindhu@gmail.co