vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

जालना (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’च्या समर्थनार्थ आज दि. १६ रोजी गुरुवारी सकाळी ९.०० वा जालना मामाचौका मध्ये एकत्रित होऊन नरेंद्र मोदी सरकारने ने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी सर्व महिला एका ठिकाणी येऊन केंद्र सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी व नारेबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष केला. त्या नंतर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, महापौर वंदना मगरे, माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंटया, नगरसेविका सुशीला दानवे, पूनम स्वामी या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात भव्य रैलीचे आयोजन करून रैली मामाचौक-सावरकर चौक-अलंकार चौक-महावीर चौक ते परत मामा चौक या ठिकाणी येऊन रैली चा समारोप करण्यात आला. या रैली मध्ये जालना शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महिलांनी हातात विधेयकाच्या समर्थनाचे फलक घेऊन केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. यावेळी फुगड्या खेळून नारी शक्ती वंदन विधेयकाचा विजय असो” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार”“महिला सक्षमीकरण – देशाची प्रगती” नारी शक्ती वंदन चा विजय असो, नारी शक्ती की पुकार सिर्फ मोदी सरकार, दिला नारी शक्तीला सन्मान मोदीजींचा आम्हाला अभिमान अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीत केवळ राजकीय कार्यकर्त्याच नव्हे, तर बचत गटातील महिला, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी आणि गृहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला ३३% आरक्षणाचा निर्णय हा महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अधिकारांचा विजय आहे. या निर्णयामुळे महिलांना राजकारणात नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळणार असून, देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक बळकट होईल. महिलांचे विचार, अनुभव आणि दृष्टिकोन शासन व्यवस्थेत समाविष्ट झाल्यास अधिक समतोल आणि सर्वसमावेशक निर्णय घेता येतील. हा निर्णय भारताला अधिक प्रगत आणि सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

यावेळी संगीताताई गोरंटयाल म्हणाल्या की, महिलांना ३३% आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना राजकारणात पुढे येण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे महिलांचे सक्षमीकरण अधिक वेगाने होईल आणि समाजात त्यांचा सन्मान वाढेल. महिलांनी आता पुढे येऊन नेतृत्व स्वीकारणे गरजेचे असून, देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी आवाहन केले.

या रॅलीचे आयोजन शुभांगी देशपांडे यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या की, मोदी सरकारने महिलांना राजकारणात समान हक्क व संधी मिळवून देण्यासाठी ३३% आरक्षणाचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या अधिक सक्षमपणे समाज व देशाच्या विकासात योगदान देतील. भविष्यात निर्णय प्रक्रियेत महिलांची भूमिका अधिक प्रभावी होणार आहे. तसेच, या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या सर्व माता-भगिनींचे त्यांनी मनःपूर्वक आभार.

यावेळी उपमहापौर राजेश राऊत, अशोक पांगारकर, विजय कामड, धनराज काबलिये, महेश निकम, अमोल धानुरे, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर, अरुणा जाधव, शशिकांत घुगे, सखुबाई पणबिसरे, सुषमा खरात, वर्षा राऊत, ज्योती सले, कल्याण भदनेकर, श्रद्धा साळवे, अनिता खोडवे, कार्तिका इंगळे, वीरेंद्र धोका, आनंद झारकंडे, ऐश्वर्या आडेकर, मंगल गरदास, स्नेहलता कामड, यास्मिन शेख, संजय पाखरे, रोहित भूरेवाल, पार्वताबाई देशमाने, सुलोचना गोर्डे, संजय भगत, रेखा भवर, गणेश जल्लेवार, नंदकिशोर गरदास, मनोज इंगळे, राधाबाई जाधव, कविता कनिसे, लक्ष्मी भवरे, गुन्नाबाई सूर्यवंशी, शकुंतला वाघ, मंदाबाई मुंगसे, राधाबाई सासणे, आकाश देशमाने, आदित्य बोराडे, पुष्पा मेहेत्रे, वैशाली बनसोडे, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, सुहास वावरे, अमित मानधने, रवी सले, संदीप नाईकवाडे, बापू साळवे, ज्ञानेश्वर ढोबळे, अमोल भवर, इत्यादी प्रमुख मान्यवर नगरसेवकांसह जालना शहरातील महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत- मंत्री योगेश कदम