vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

धारावी टी जंक्शन तपासे चौकातील हम सब एक है शिल्पाची देखभाल करा, फेस कॉम संलग्न धारावीतील हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी

मुंबई (प्रतिनिधी )सायन बांद्रा लिंक रोड, टी जंक्शन येथील वीरशैव गणपतराव तपासे चौक येथे दि.२१ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे हम सब एक है हे शिल्प व चौक सुशोभीकरण करून बसविण्यात आले. परंतु या चौकाची व शिल्पाची नियमित देखरेख होत नसल्याने या शिल्पाची व चौकाची दुरवस्था झाली आहे.आजूबाजूची झाडी वाढली आहे. संरक्षण जाळी तुटली आहे. शिल्पाचे रंग फिके पडले आहे. शिल्पांना कडे जात आहे.शिल्पा भोवती गर्दुल्ले,दारुडे रात्रीचा निवारा घेताना दिसतात. संपूर्ण जागा भुसभुशीत झाली असून, हिरवळ नष्ट होत आहे. त्यामुळे या शिल्पाच्या सौंदर्याला व हम सब एक है या संदेशाला नुकसान पोहोचत आहे.मुंबईकर दिवसभर या शिल्पा बद्दल व संदेशाबद्दल चर्चा करत असतात.त्याचबरोबर शिल्पा भोवती व आजूबाजूला पोस्टर्स बॅनर लावून विद्रूपीकरण केले जाते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.कृपया या शिल्पा वा चौकाकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी लक्ष घालून ही सुंदर आकर्षक सुरक्षित व राष्ट्रीय संदेश देणारे शिल्प जपावी अशी मागणी फेस कॉम संलग्न हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावीचे प्रमुख श्री दिलीप गाडेकर, शंकर बळी श्रीम लिला वाकळे,श्रीमती पुष्पा कांबळे,श्रीमती अलका साबळे यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ही-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम व सफाईमित्रांचा कृतज्ञ सन्मान…

vishwatmaklokswamivarta

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा – उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta