vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

 

 सांगली, प्रतिनिधी : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षात २००८ रुग्णांना सुमारे १४ कोटी ४० लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.       मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

२० गंभीर आजारासाठी मदत , कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.

आर्थिक वर्षातील मदत, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत सांगली जिल्ह्यातील २००८ रुग्णांना सुमारे १४ कोटी ४० लाख २३ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक झाले आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. पेपरलेस प्रक्रिया आणि रुग्णालयांच्या सहभागामुळे अर्जांचा निपटारा अधिक वेगाने होत आहे. अधिक माहितीसाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ

विशेष वृत्त:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा,जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

vishwatmaklokswamivarta