vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

गडचिरोली, प्रतिनिधी: सेवा हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवांमध्ये कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे. प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे, वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली…

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना #लंगर वाढून केली सेवा

vishwatmaklokswamivarta