vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

        सांगलीसा1 प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ दि. 1 मे 2026 रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, विश्रामबाग, सांगली येथे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

            मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी दि. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये. तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी ९.०० वाजेपर्यंत ६.४२% मतदान नोंद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत