vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव ‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव-‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात २८ एप्रिल हा ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांना त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील तिन्ही तहसीलदार कार्यालयांत अत्याधुनिक ‘सेतू सुविधा केंद्रे’ उभारून जनतेला तत्काळ व पारदर्शक सेवा देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल आणि राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झालाअत्याधुनिक सोयींनी युक्त ‘सेतू’चा यशस्वी प्रयोग जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुढाकार घेऊन मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या तिन्ही तहसीलदार कार्यालयांचा चेहरामोहरा बदलला आहे. येथे उभारण्यात आलेली ‘सेतू सुविधा केंद्रे’ केवळ प्रशस्तच नाहीत, तर ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. सामान्य नागरिकांना त्यांचे जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यांसारख्या सेवा मिळवताना कोणताही त्रास होऊ नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

लोकाभिमुख प्रशासनावर शिक्कामोर्तब,प्रशासनात सुलभता आणि गती आणण्यासाठी कटियार यांनी राबवलेल्या या मॉडेलचे कौतुक राज्यभर होत आहे. सेतू केंद्रांत येणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था, टोकन यंत्रणा आणि जलद कार्यपद्धती , whatsapp chatbot आणि whatsapp वरती दाखले वितरण, यामुळे शासकीय कामांतील विलंब कमी झाला आहे. यामुळे वेळेत दाखले वितरण प्रमाण ५९% वरून ९९% पर्यत सुधारणा झाली आहे.

00000

संबंधित पोस्ट

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

मुंबईत न्यायासाठी सकल मातंग समाजाची चिंतन बैठक संपन्न..

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले