vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

पुणे, प्रतिनिधी: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी याबाबतच्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डने या बोगद्याची रुंदी जगात सर्वाधिक 22.33 मीटर अशी जाहीर केली. तत्पूर्वी एमएसआरडीसीचे अधिकारी आणि नवयुगाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांना या बोगद्याच्या कामाबाबतची तांत्रिक माहिती दिली.

००००

संबंधित पोस्ट

आज 26 वा कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा हिंदु धर्मात विधीवत पुनर्प्रवेश!**‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे!* – श्री. सुनील घनवट 

पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta