vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  -पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र दिनानिमित्त साताऱ्यात मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न

सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय -पालकमंत्री शंभूराज देसाई-महाराष्ट्र दिनानिमित्त साताऱ्यात मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न

सातारा प्रतिनिधी: स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या थोर सुपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सातारा जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा सकुल येथे महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानमित्त राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकड, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१९६० साली महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ आणणाऱ्या यशवंतरावजी चव्हाण आणि जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व थोर व्यक्तींचे कृतज्ञता पूर्वक स्मारक करून ते म्हणाले, राज्याने परकीय गुंतवणुकीचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून, दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवून ठेवले. इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणणे हे शासनाचे ध्येय असून, अपूर्ण राहिलेले जलप्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

सातारा जिल्ह्याने राबविलेल्या ‘मॉडेल स्कूल’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनांचे सादरीकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करत असून, या विकासयात्रेत जिल्हावासियांनी साथ द्यावी.पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत सर्वप्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे नितीन तळपे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद दंडगव्हाळ यांना देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक जिल्हास्तरीय पुरस्कार वैशाली कृष्णात चोरमले व सुचित्रा घोगरे काटकर.जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०२६ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय साताराश्रीमती आर्या देवेंद्र बारटक्के गुणवंत खेळाडू महिला बॉक्सिं, कुशल कुमार मोहिते गुणवंत खेळाडू पुरुष मैदानी,वेदांत संदीप साळुंखे गुणवंत खेळाडू दिव्यांग मैदानी विनोद विलास कदम गुणवंत मार्गदर्शक स्केटिंग

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तर्फे देणेत येणारा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार रावू सतिश मुंगळे तहसिल कार्यालय कोरेगाव यांना देण्यात आला. नलिनी मंगेश कांबळे (अहिवळे) वर्ग-४ शिपाई कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचाही उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पालकमंत्री श्री देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पोलीस प्रशासनामार्फत विलास नभु माने, पोलीस पाटील मस्करवाडी ता. जि. सातारा यांनाही पालकमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.गुणवंत खेळाडू महिला आर्या देवेंद्र बारटक्के बॉक्सिंग, कुशल कुमार मोहिते, गुणवंत खेळाडू पुरुष मैदानी वेदांत संदीप साळुंखे, गुणवंत खेळाडू दिव्यांग मैदानी विनोद विलास कदम, गुणवंत मार्गदर्शक स्केटिंग, आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार रावू सतिश मुंगळे तहसिल कार्यालय .ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानामध्ये आदरांजली अर्पण केली.

0000

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

दिवाळीसणासाठी शेतकऱ्यांना ‘समृद्धी’कडून चौथा वाढीव हप्ता दिवाळीपूर्वी 100 रुपये मे.टन प्रमाणे रक्कम होणार जमा

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी; आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे

ऐतिहासिक, भव्य-दिव्य अन् शिस्तबद्ध आयोजन !खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे