vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य प्रतिनिधी

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे घेण्यात आला. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार उपस्थित होते.

यावेळी वाई तालुक्यातील उडतारे व बोपर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच खंडाळा तालुक्यातील भादे व महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असून, उर्वरित कामांना गती देण्याचे तसेच आवश्यक पदनिर्मितीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

बैठकीत इंडियन ‘रेड क्रॉस सोसायटी’ संचलित महाबळेश्वर येथील ‘बेल एअर हॉस्पिटल’ च्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालयात आयसीयू (5 खाटा), डायलेसिस (3 खाटा) सुविधा देण्याच्या व अतिरिक्त पदांनाही मान्यता देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

संबंधित पोस्ट

गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच- जिल्हाधिकारी अशोक काकडे- आगामी 90 दिवस एचपीव्ही मोफत लसीकरण मोहीम- जिल्ह्‌यात 22 हजारहून अधिक लसीकरणाचे लक्ष्य

आदिवासी भागात आरोग्य विषयक जनजागृती करावी- मंत्री डॉ. अशोक वुईके

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*

vishwatmaklokswamivarta