vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बुलढाण्यात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा’निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

बुलढाण्यात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा’निमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

 

 बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताहा’निमित्त भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. थॅलेसेमिया आणि हिमोग्लोबिनोपॅथी यांसारख्या अनुवांशिक रक्तविकारांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने या रॅलीचे नियोजन करण्यात आले. रॅलीमध्ये विविध घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना आजाराचे स्वरूप, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेषतः विवाहपूर्व आणि गर्भधारणापूर्व तपासणी करणे थॅलेसेमिया रोखण्यासाठी किती आवश्यक आहे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या संकल्पनेंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमार्फत उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून 5 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, हातेडी बु. येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात सकारात्मकता वाढावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार असल्याने रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते, त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कर्तव्य असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

 या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. मयुरी टेकाळे, डॉ. विश्वास खर्चे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डॉ. महेश गोरे, डॉ. आशिष गायकवाड, अध्यापिका शेळके, अर्चना आराख, ज्ञानेश्वर गाडेकर, अमोल गिरी, गणेश गायकवाड यांच्यासह परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थॅलेसेमिया नियंत्रणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच- जिल्हाधिकारी अशोक काकडे- आगामी 90 दिवस एचपीव्ही मोफत लसीकरण मोहीम- जिल्ह्‌यात 22 हजारहून अधिक लसीकरणाचे लक्ष्य

एचआयव्ही नियंत्रणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा शहरात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;० ते ५ वर्षांच्या बालकांना डोस पाजण्याचे आवाहन

विशेष वृत्त:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा,जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

vishwatmaklokswamivarta