vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी -महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि पारदर्शक कामांचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचा सर्वसमावेशक आढावा घेतला. कौशल्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण केले जाते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वेगवेगळ्या भागात पूर्वनियोजन करून स्वतःहून गेले पाहिजे. इज ऑफ डूईंगच्या अत्यावश्यक सेवा तातडीने दिल्या गेल्या पाहिजेत, तसेच त्यांच्याकडे आलेल्या प्रकरणांचा निपटारा देखील तातडीने झाला पाहिजे. स्थानिक समस्या त्याच पातळीवर सोडविल्या गेल्या पाहिजेत असे सांगून शासनापर्यंत येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनात नाविन्यपूर्ण आणि चांगले काम करणाऱ्यांचे कौतुकच होईल असे सांगून शासनामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सर्व समस्या सोडविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही कारणास्तव शासनाच्या जमिनींवर अटी शर्तींचा भंग होत असल्यास त्यावर कारवाई करुन जमीन शासन जमा करावी, असे निर्देशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली. यासह नोंदणी विभाग, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुद्रांक जिल्हाधिकारी आदी विभागांच्या कामांचा मंत्री बावनकुळे यांनी यावेळी आढावा घेतला. प्रलंबित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले

००००

 

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव”- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन