vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

मुंबई प्रतिनिधी : न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांकडून अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहचे उत्साहात उद्घाटन संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा