vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

सातारा द प्रतिनिधी : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अ‌द्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उ‌द्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहेसातारा जिल्ह्यातील एकूण ३ शेतकरी राज्यस्तरावर विजेते झाले आहेत. त्यामध्ये बाजरी पिकात अशोक चंद्र नलावडे मु.पो. विरळी ता. माण यांचा राज्यात प्रथम क्रमांक, सविता मुळीक मु. पो. सासकल ता. फलटण राज्यात ‌द्वितीय क्रमांक तर भात उत्पादनात चंद्रकांत लाड मु.पो. करंजे त परळी ता. सातारा यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.

राज्यस्तरावरील विजेते ठरल्यानंतर, उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विजेते शेतकरी निवडले जाणार आहेत. सर्वसाधारण आणि आदिवासी गटांकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा वृक्षारोपणाव्दारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम उद्यान वाशी येथे शुभारंभ,महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथी नागरिकांचा उत्साही सहभाग

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख यांची पत्रकार परिषद

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट