vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट

मुंबई प्रतिनिधी-हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट

🔷कर्नाटकातील हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती ज्योती पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची या शिष्टमंडळाने माहिती जाणून घेतली. तसेच, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचीदेखील सदिच्छा भेट घेतली

🔷हुबळी-धारवाड शहराच्या महापौर श्रीमती ज्योती पाटील, उपमहापौर श्री. संतोष चव्हाण, सभागृह नेते तथा माजी महापौर श्री. इरेश आंचतगेरी, विरोधी पक्षनेते श्री. इमाम हुसेन यालिगार, उपआयुक्त (विकास) श्री. विजयकुमार आर. यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

🔷बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काल (दिनांक २१ मे २०२६) दिलेल्या भेटीप्रसंगी या शिष्टमंडळासमोर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांनी सादरीकरण केले. यामध्ये महानगरपालिका सचिव विभाग, व्यवसाय विकास विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण विभाग, पायाभूत सुविधा विभाग आदींचा समावेश होता. सादरीकरणांसह नागरी सेवा व सुविधा, पायाभूत सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन तसेच इतरही सेवा अधिक प्रभावी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची भूमिका व्यक्त केली. सर्व बैठकांनंतर या शिष्टमंडळाने महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील नियंत्रण कक्षालाही भेट दिली.

🔷यानंतर, शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचीही भेट घेतली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

महसूल विभागाच्या सेवांसाठी आता ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा-सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

छत्रपती संभाजी महाराज जयंती;जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज ठाणे स्टेशन येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समिती वतीने ठाण्यात “स्मरण मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन