vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

 

जालना,द प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद प्रशाला, स्टेशन रोड येथे जालना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, कृत्रिम पाय तसेच पोलिओग्रस्त व्यक्तींना कॅलिपर्सचे वाटप विशेष सहाय्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जवळपास 80 लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग्य नियोजन व उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच बुधवार, दि. 26 मे 2026 रोजी हे विशेष शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले.यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. खरात यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

 

****

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन

क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

दापूर माळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा

vishwatmaklokswamivarta

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु